शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वैवाहिक बलात्कार ठरेल घटस्फोटाचे कारण- केरळ उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:16 IST

घटस्फोटाविरुद्ध डॉक्टर पतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना केरळ उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला.

थिरुवनंतपुरम : वैवाहिक बलात्कार हे घटस्फोट घेण्यासाठी पुरेसे कारण ठरू शकते, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. वैवाहिक बलात्कारास कायद्यानुसार मान्यता नसली तरी त्यास एक क्रौर्य ठरवून घटस्फोट मंजूर करण्यापासून न्यायालयास रोखले जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.घटस्फोटाविरुद्ध डॉक्टर पतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना केरळ उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले की, पत्नीचे शरीर आपल्या मालकीचे आहे, असे समजून तिच्या मर्जीविरुद्ध केलेला समागम हा वैवाहिक बलात्कारच आहे.  यासंबंधीचा अनादर हा वैयक्तिक स्वायत्ततेचे उल्लंघनच आहे. केरळ उच्च न्यायालयाचे न्या. ए. मुहमेद मुस्ताक आणि डॉ. कौसर एदप्पागथ यांच्या खंडपीठाने ३० जुलै रोजी हा निर्णय दिला. निवाड्याची प्रत शुक्रवारी अपलोड करण्यात आली. देशात लग्न आणि घटस्फोटासाठी धर्मनिरपेक्ष कायदा करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्टपणे नमूद करतानाच न्यायालयाने म्हटले की, आपल्या वैयक्तिक कायद्यानुसार विवाह करण्यास प्रत्येक नागरिक मुक्त आहे. पत्नीचे पतीवर गंभीर आरोपया प्रकरणातील पत्नीने पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्नीने म्हटले की, आपण आजारी असतानाही पती समागमासाठी जबरदस्ती करायचा. आपल्या आईचे निधन झाले त्या दिवशीही त्याने जबरदस्ती समागम केला.अनैसर्गिक समागमासाठीही तो जबरदस्ती करायचा. इतकेच नव्हे, तर आपल्या मुलीसमोरही समागमासाठी जबरदस्ती करायचा. इतके सारे सहन करूनही तो आपल्यावरच अनैतिक संबंध असल्याचा संशय घ्यायचा.

टॅग्स :Divorceघटस्फोट