शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

केडगावला आजपासून ढोक महाराज यांच्या रामकथेचे आयोजन मराठी नववर्ष : वारकरी सेवा संघ व कल्याणी प्रतिष्ठानचा उपक्रम

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

केडगाव : गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त केडगाव येथे वारकरी सेवा संघ व कल्याणी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारपासून तुलसी रामायण ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी केडगावकरांना मिळणार आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक दिलीप सातपुते यांनी केले.

केडगाव : गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त केडगाव येथे वारकरी सेवा संघ व कल्याणी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारपासून तुलसी रामायण ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी केडगावकरांना मिळणार आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक दिलीप सातपुते यांनी केले.
सातपुते यांच्या पुढाकारातून मराठी नववर्षानिमित्त रामथकेचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. पंढरीनाथ महाराज देवकर यांच्या हस्ते ध्वजपूजन तर माजी आ.अनिल राठोड यांच्या हस्ते कलशपूजन होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या हस्ते वीणा पूजन, माजी महापौर शिला शिंदे यांच्या हस्ते तुलसी पूजन तर आ. मोनिका राजळे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाचा कार्यक्रम होईल. शनिवार, दि. २१ मार्च ते शुक्रवार, दि. २७ मार्च पर्यंत रोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत शिवपार्वती विवाह, श्रीराम जन्म, सीता स्वयंवर, केवट कथा, शबरी उद्धार, लंका दहन व रावण वध, श्रीराम राज्याभिषेक असे दैनंदिन कथेचे विषय राहतील. भूषणनगर येथील लिंकरोड लगतच्या मैदानात रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेवक दिलीप सातपुते, विठ्ठल महाराज तांदळे, रावसाहेब महाराज भाकरे यांनी दिली. रामराव महाराज ढोक यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याचा लाभ घेण्याचे आवाहन कल्याणी प्रतिष्ठानने केले आहे.