शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा, याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 05:55 IST

वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

नवी दिल्ली : वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयाने आता वैद्यकीय व दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणानुसार प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सर्व प्रवेश मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरच्या निर्णयाच्या अधीन असतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.न्या. संजय कौल, न्या. गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आरक्षणाची मूळ याचिका सध्या प्रलंबित आहे. त्यातच हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावे, अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वैद्यकीयच्या ११६८ सरकारी आणि ६१९ खासगी जागा महाराष्ट्रात आहेत. तसेच, पदव्युत्तर दंतवैद्यकीयच्या ४६ सरकारी आणि ३८३ खासगी जागा महाराष्ट्रात आहेत.राज्य सरकार सुप्रीम कोर्टातपदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी मराठा समाजाला दिलेले आरक्षण यंदा ग्राह्य धरण्यात येणार नाही, या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मे २०१९मध्ये हा निकाल दिला होता. त्यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात ८ मार्च २०१९ रोजी जो सरकारी आदेश काढला आहे. तो पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गृहीत धरता येणार नाही. कारण, या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया १६ ऑक्टोबर २०१९ आणि २ नोव्हेंबर २०१९ रोजीच सुरू झाली होती, असे सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण