शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 18:34 IST

या भाजप नेत्यावर माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली.

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. येथील बिजापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री माओवाद्यांनी एका भाजपच्या नेत्याची कथितरित्या हत्या केल्याची घटना घडली. या भाजप नेत्यावर माओवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माओवाद्यांनी ३५ वर्षीय कुडियाम माडो यांना त्यांच्या राहत्या घरातून ओढून नेले आणि त्यांचा गळा दाबून हत्या केली. कुडियाम माडो हे भाजपच्या शेतकरी संघटनेच्या भारतीय जनता किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. तसेच, घटनास्थळावरून प्रतिबंधित सीपीआयच्या (माओवादी)  बिजापूर नॅशनल पार्क एरिया कमिटीने जारी केलेले पॅम्प्लेट देखील जप्त केले आहेत, ज्यामध्ये माओवाद्यांनी कुडियाम माडो यांना पोलिसांचा खबरी असल्याचे म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक फरसेगड पोलिसांनी कुडियाम माडो यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, रमणसिंग यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते महेश गगडा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, कारण बस्तरमध्ये मारले गेलेले बहुतांश भाजप नेते बिजापूरचे आहेत, असे महेश गगडा यांनी म्हटले आहे.

या घटनेसह, या वर्षात आतापर्यंत बस्तर विभागात वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद्यांच्या हिंसाचारात ६० हून अधिक लोक मारले गेले आहेत. जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान विभागात वेगवेगळ्या घटनांमध्ये ९ भाजप नेत्यांची हत्या करण्यात आली. नुकतीच माओवाद्यांनी बिजापूरमध्येच एका अंगणवाडी सहायकाची हत्या केली होती. हत्येनंतर मृतदेह घरात टाकून ते घटनास्थळावरून फरार झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाnaxaliteनक्षलवादी