शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अनेक महिलांवर बलात्कार केला; संतप्त महिलांनी हत्येनंतर जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:51 IST

Crime News: ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातून बलात्कारात आरोपी असलेल्या ६० वर्षीय आरोपीची संतप्त महिलांनी हत्या करून मृतदेह जाळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

भुवनेश्वर -  ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातून बलात्कारात आरोपी असलेल्या ६० वर्षीय आरोपीची संतप्त महिलांनी हत्या करून मृतदेह जाळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी १० जणांना गजाआड केले असून, त्यात ८ महिलांचा समावेश आहे.

गावापासून २ किमी टेकडीवरून मृताची हाडे व राख ताब्यात घेतली गेली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात ज्या महिलांना पकडण्यात आले आहे, त्या सर्वांवर लैंगिक अत्याचार झाला होता. चार वर्षांपूर्वी आरोपीच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर तो महिलांचे शोषण करू लागला. अटकेतील महिलांचे त्याने शोषण केलेले आहे. परंतु, महिलांनी त्याच्याविरोधात कधीही तक्रार दाखल केली नाही. गजपतीचे पोलिस अधीक्षक जतिंद्र कुमार पांडा यांनी सांगितले की, महिलांनी कधीही पोलिसांकडून मदत मागितली नाही किंवा तक्रारही दाखल केलेली नाही. मात्र, संताप अनावर झाल्यानंतर आरोपीवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला संपवले.

विधवेवर बलात्कार केल्यानंतर असंतोष वाढलाआरोपी अनेक वर्षांपासून महिलांवर अत्याचार करत होता. ३ जून रोजी त्याने विधवेवर बलात्कार केला. यानंतर संतप्त महिलांनी बैठक घेऊन आरोपीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सर्व महिला त्याच्या घरी गेल्या. त्या वेळी तो झोपलेला होता. त्याचवेळी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले गेले. हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला. या घटनेत दोन पुरुषांनीही महिलांना मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशा