कायद्याचा दुरुपयोग करत पुरुषांना त्रास देतात अनेक महिला, आता पत्नीपीडितांसाठी हवा आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 12:25 AM2018-09-03T00:25:23+5:302018-09-03T00:25:44+5:30

कायद्याचा दुरुपयोग करत अनेक महिला पुरुषांना त्रास देतात. अशा प्रकरणात पुरुषांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी भाजपच्या दोन खासदारांनी केली आहे.

Many women harass men with abuse of law, now commission | कायद्याचा दुरुपयोग करत पुरुषांना त्रास देतात अनेक महिला, आता पत्नीपीडितांसाठी हवा आयोग

कायद्याचा दुरुपयोग करत पुरुषांना त्रास देतात अनेक महिला, आता पत्नीपीडितांसाठी हवा आयोग

googlenewsNext

नवी दिल्ली : कायद्याचा दुरुपयोग करत अनेक महिला पुरुषांना त्रास देतात. अशा प्रकरणात पुरुषांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी भाजपच्या दोन खासदारांनी केली आहे. उत्तरप्रदेशातील घोसी येथील खासदार हरिनारायण राजभोर आणि मध्यप्रदेशातील हरदोई येथील अंशुल वर्मा अशी या खासदारांची नावे आहेत.
या खासदारांनी सांगितले की, पुरुष आयोगाच्या समर्थनार्थ २३ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाचो आयोजन करण्यात आले आहे. हा मुद्दा आपण संसदेतही उपस्थित केला असल्याचे त्यांनी सांगितले. राजभर म्हणाले की, अनेक पुरुषांना पत्नीकडून त्रास होतो. असे अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. महिलांना न्याय मिळण्यासाठी कायदे आणि अशी व्यासपीठे आहेत. पण, पुरुषांच्या चिंतांबाबत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पुरुषांसाठीही स्वतंत्र आयोगाची आवश्यकता आहे. ते म्हणाले की, मला असे म्हणायचे नाही की, प्रत्येक महिला चुकीची आहे किंवा प्रत्येक पुरुष चुकीचा आहे. दोघांकडूनही एकमेकांवर अत्याचार होतात. त्यामुळे पुरुषांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी पुरुषांचा राष्ट्रीय आयोग असायला हवा.

कायदेशीर सुरक्षा मिळायला हवी
खा. वर्मा म्हणाले की, संसदेच्या स्थायी समितीकडे हा मुद्दा आपण मांडला आहे. कलम ४९८ अ हे पुरुषांना त्रस्त करण्यासाठी एक साधन बनले आहे. ते म्हणाले की, १९९८ ते २०१५ या काळात २७ लाख लोकांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. आम्ही येथे समानतेच्या बाबतीत चर्चा करत आहोत. अशा प्रकरणात पुरुषांना कायदेशीर सुरक्षा मिळायला हवी.

महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी गेल्या वर्षी स्पष्ट केले होते की, पुरुषांविरुद्धच्या खोट्या तक्रारीत वाढ झाली. याबाबत त्यांनी एनसीडब्ल्यूला सांगितले होते की, पुरुषांनाही तक्रारीसाठी खिडकी उपलब्ध करा.

Web Title: Many women harass men with abuse of law, now commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.