शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या सभागृहातील अनुपस्थितीने अनेक जण संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 05:51 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून (१८ नोव्हेंबर) सभागृहात सतत गैरहजर असल्यामुळे प्रत्येक जण संभ्रमात पडला आहे. गांधी बहुधा उद्याही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून (१८ नोव्हेंबर) सभागृहात सतत गैरहजर असल्यामुळे प्रत्येक जण संभ्रमात पडला आहे. गांधी बहुधा उद्याही लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही.सूत्रांनी दिलेली माहिती विश्वासार्ह मानल्यास गांधी शुक्रवारी रात्री अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहेत. ते परत कधी येतील याची काहीही कल्पना नाही. गेला संपूर्ण आठवडा राहुल गांधी हे पक्षाच्या नेत्यांना न भेटता त्यांच्या १२ तुघलक लेनवरील निवासस्थानी होते. पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या कोणत्याही बैठकीत राहुल गांधी सहभागी नव्हते. मात्र काही प्रसार माध्यमांत राहुल गांधी हे महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाण्याच्याविरोधात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, राहुल गांधी यांचे विश्वासू व पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि राजकीय गुरू ए. के. अँटोनी यांनी पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत महाराष्ट्रात शिवसेनेसोबतच्या मैत्रीला हिरवा कंदील दाखवला होता.पक्षाच्या नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितले की, राहुल गांधी हे मोबाईलवर फोन केल्यास तसेच एसएमएस केल्यावर त्यालाही उत्तर देत नाहीत. राजकीय घडामोडींपासून राहुल गांधी हे पूर्णपणे वेगळे झाल्यामुळे सोनिया गांधी यांना एकटीला कठीण संघर्ष असलेली लढाई लढावी लागत आहे. राहुल गांधी हे पक्षात जे घडावे वाटते ते घडत नसल्यामुळे तसेच नेते त्यांचे अनुसरण करीत नसल्यामुळे खूपच हताश झाले असून निराशही आहेत, असे सूत्रांनी सांगितले. बहुधा याच कारणांमुळे राहुल गांधी हे कंबोडियाहून परतल्यावर ब्राझीलला खासगी दौऱ्यावर गेले होते. ते १५ नोव्हेंबर रोजी दिल्लीला परतले आणि २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा देशाबाहेर गेले. १९ नोव्हेंबर रोजी त्यांची आजी इंदिरा गांधी यांची जयंती होती तरीही राहुल गांधी शक्तीस्थळावर त्यांना आदरांजली वाहण्यास गेले नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस