शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर ट्रस्टच्या नावावर अनेकांची फसवणूक,QR कोडद्वारे देणगी मागितली; विश्व हिंदू परिषदेची यूपी पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 12:54 IST

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यातच आता फसवणुकीच्या काही घटना समोर आल्या आहेत, राम मंदिर ट्रस्टच्या नावावर QR कोडच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार विश्व हिंदू परिषदेने उत्तर प्रदेश पोलिसांत केली आहे. 

उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड, म्हणाले...

विश्व हिंदू परिषदेने सांगितले की,  काही लोक अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या नावावर कोणतीही मान्यता न घेता पैसे मागत आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. लोकांना क्यूआर कोड पाठवून फसवणूक केली जात असल्याचेही तक्रारीत समोर आले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी लोकांना मंदिर ट्रस्टच्या नावावर फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या जाळ्यात न येण्याचे आवाहन केले. त्यांनी यूपी पोलीस प्रमुखांना पाठवलेली तक्रारही शेअर केली. बन्सल यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही उत्तर प्रदेश डीजीपी, लखनौ रेंज आयजी यांना आस्थाच्या प्रकरणात त्वरित कारवाई करण्यासाठी औपचारिक तक्रार पाठवली आहे. त्यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने तयार केलेले फेसबुक पेज शेअर केले आहे. यामध्ये क्यूआर कोडद्वारे देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

विनोद बन्सल म्हणाले की, काही लोक टेम्पल ट्रस्टच्या नावाने बनावट आयडी बनवून पैशांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते की, अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी कोणालाही स्वतंत्र समिती स्थापन करण्याची आणि पैसे गोळा करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत समाजानेही सतर्क राहणे गरजेचे असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी सांगितले होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश