शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली होती- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 22:30 IST

पंतप्रधान मोदींनी गुजरात दौऱ्यादरम्यान मानले मतदारांचे आभार

अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीनंतर गुजरातला गेलेल्या पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. सहा टप्प्यातील मतदानानंतर मी भाजपाच्या 300 जागा येतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी अनेकांनी माझी खिल्ली उडवली होती. मात्र माझा अंदाज खरा ठरला, असं मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलं. भाजपाला भरभरुन मतदान करत सलग दुसऱ्यांदा सर्वच्या सर्व जागांवर पक्षाला विजयी केल्याबद्दल त्यांनी गुजराती मतदारांचे आभार मानले. मोदींनी त्यांच्या गुजरात भेटीदरम्यान आईची भेट घेऊन आशीर्वादही घेतले.देशासाठी पुढील पाच वर्ष अतिशय महत्त्वाची असल्याचं मोदी म्हणाले. 'पुढील पाच वर्षांचा वापर देशातील सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आहे. आम्हाला जागतिक स्तरावर भारताची स्थिती सुधारायची आहे,' असं मोदीनी म्हटलं. यावेळी त्यांनी सूरतमधील एका इमारतीत झालेल्या अग्नीतांडवात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकारला दिल्या. मोदींनी त्यांच्या भाषणातून गुजराती जनतेचे आभार मानले. 'गेल्या निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व जागांवर मतदारांनी भाजपाला विजयी केलं. यंदाही तेच घडलं. मात्र यंदाचा विजय अधिक मोठा आहे. राज्यातील 182 पैकी 173 जागांवर भाजपानं आघाडी घेतली. राज्यातील जनतेनं सकारात्मक मतदान केलं,' असं मोदी म्हणाले. 'ज्या जमिनीनं माझं पालन पोषण केलं, तिथं मी आज आलो आहे. 2014 मध्ये देशाला गुजरातच्या विकासाचं मॉडेल समजलं. 2014 मध्ये गुजरात सोडून पुढे गेलो. तुमच्या संस्कारांमुळे आजही पुढे जात आहे,' अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात