शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गैर-गांधी माजी पंतप्रधान अन् उपपंतप्रधानांचे नातेवाईक ‘एनडीए’त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 12:35 IST

घराणेशाहीवरून विरोधक लक्ष्य, पण सत्ताधाऱ्यांचे इनकमिंग फ्री

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विस्तारित परिवारात आता गैर-गांधी कुटुंबांतील अनेक माजी पंतप्रधान आणि उपपंतप्रधानांच्या कुटुंबातील सदस्य सामील झाले आहेत.

माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे पुत्र, हरयाणाचे मंत्री आणि अपक्ष आमदार रणजितसिंह चौटाला या यादीत सर्वात अलीकडे आलेले आहेत. हिस्सार लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. इतरांमध्ये दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. नरसिंह राव यांचे पुत्र प्रभाकर राव लवकरच तेलंगणात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राव यांचे नातू एन. व्ही. सुभाष हे आधीच भाजपमध्ये आहेत.

समाजवादी माजी पंतप्रधानांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी देखील भाजपमध्ये किंवा त्याच्या मित्रपक्षांत बस्तान बसविले आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी २०१९ मध्ये समाजवादी पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत.

जनता पक्षाचे दिग्गज आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र आरएलडी संस्थापक अजित सिंह यांनी एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील दोन्ही सरकारांच्या मंत्रिमंडळात काम केले होते. गेल्या महिन्यात दिवंगत अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जाण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीची साथ सोडली. 

लालबहादूर शास्त्रींचे नातेवाईक विविध पक्षांतलालबहादूर शास्त्री यांच्या नातेवाइकांच्या राजकीय निष्ठा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिकृष्ण शास्त्री हे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या इतर मुलांपैकी सुनील शास्त्री यांनी अनेक वेळा काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केला. तर १९८०च्या दशकात जनता दलात राहिलेले अनिल शास्त्री अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत आहेत.

कर्नाटकमध्येही एनडीएचा विस्तारमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दलानेही (धर्मनिरपेक्ष) कर्नाटकमध्ये एनडीएशी आघाडी केली आहे. त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा विजय झाल्यास ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री होऊ शकतात.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४