नवी दिल्ली : मॉडेल जेसिका लाल हिच्या खुनाबद्दल दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेप भोगत असलेल्या सिद्धार्थ वशिष्ठ उर्फ मनू शर्मा (४१) याच्या सुटकेला माझा आक्षेप नाही. मी त्याला क्षमा केली आहे, असे जेसिकाची बहीण सबरिना लाल यांनी म्हटले आहे. मनू शर्मा २००६ पासून तुरुंगात आहे. त्याने तुरुंगात १५ वर्षे काढली आहेत. तुरुंगात शर्मा चांगले वागत असून, त्याने इतर कैद्यांना मदतही केली आहे. त्यामुळे त्याच्यात सुधारणा झाली आहे, असे वाटते, असे त्यांनी तिहार कारागृहाच्या कैदी कल्याण विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. लाल पत्रात, मदत वा भरपाई नाकारताना म्हटले की, मला त्याची गरज नाही. ज्यांना गरज आहे, त्यांना ती द्यावी, अशी माझी विनंती आहे.
मनू शर्माच्या सुटकेला आक्षेप नाही : सबरिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:40 IST