शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

आयएमए घोटाळ्यातील आरोपी मन्सूर खान भारतातून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 05:50 IST

२३ हजार लोकांची १५०० कोटी रुपयांची केली फसवणूक

बंगळुरू : २३ हजारांपेक्षा जास्त लोकांना फसविणारा ‘इस्लामिक बँकर’ आणि ‘आय मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी’ (आयएमए) समूहाचा संस्थापक मोहंमद मन्सूर खान हा ८ जूनच्या रात्री भारत सोडून पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घोटाळ्यातील आकडा १,५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

बंगळुरू पोलिसांनी खानविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली पण त्याआधीच त्याने देशातून पलायन केले आहे. खानविरुद्ध शनिवारी पहिली तक्रार दाखल झाली. त्यानंतर २४ तासांत खानच्या आवाजातील एक कथित आॅडिओ क्लिप व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल झाली. ‘आपण आत्महत्या करण्याच्या स्थितीत आहोत,’ असे तो त्यात म्हणत आहे. या क्लिपमुळÞे या घोटाळ्याला वाचा फुटली. हजारो गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे धावले. पण तोपर्यंत खान दूरवर निघून गेला होता.

पोलिसांनी सांगितले की, खान एकटाच विमानाने दुबईला गेला आहे. कुटुंबियांना त्याने आधीच देशाबाहेर पाठविले असण्याची शक्यता आहे. आयएमएच्या सातपैकी निजामुद्दीन अजीमुद्दीन या संचालकास अटक केली आहे. खानविरुद्ध त्याचे व्यावसायिक भागीदार मोहंमद खालीद अहमद यांनी फसवणुकीची केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीमुळेही गुंतवणूकदारांत घबराट पसरली.व्याज नव्हे, परतावाइस्लाममध्ये व्याज घेणे निषिद्ध असल्यामुळे अनेक धार्मिक मुस्लिम बँकांमध्येही पैसे ठेवत नाहीत. याचा फायदा खान याने घेतला. तो आपल्या योजनेत पैसे गुंतविणाऱ्यांना ‘भागीदार’, तर व्याजाला परतावा संबोधित असे. गुंतवणुकीवर तो ७ ते ८ टक्के परतावा देत असे. खान चालवीत असलेल्या पोंझी योजनांचा परतावा येणे मार्चपासून बंद झाले होते.

एका गुंतवणूकदाराचा धक्क्याने मृत्यूआयएमए समूहात ८ लाख गुंतविणाºया ५४ वर्षीय अब्दुल पाशा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाशा यांच्या मुलीचे जुलैमध्ये लग्न होणार होते. पैसे बुडल्याने लग्न कसे होणार, याचा त्यांना जबर धक्का बसला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर