शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

28 वर्षांनंतर एनडीएचे वर्गमित्र होणार तीन सेनांचे प्रमुख, वायुसेनेत होते तिघांचे वडील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:46 IST

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे लवकरच नवे लष्करप्रमुख होणार आहेत.

नवी दिल्लीः लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे लवकरच नवे लष्करप्रमुख होणार आहेत. जनरल बिपीन रावत सेवानिवृत झाल्यानंतर 13 लाखांची क्षमता असलेल्या लष्कराची ते धुरा सांभाळणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ऑपरेशन आणि कमांडचा प्रदीर्घ अनुभव असलेले नरवणे जनरल बिपीन रावत यांच्यानंतर कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज मुकुंद नरवणे, एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया आणि नौदल प्रमुख करमबीर सिंह यांनी 1976मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी(एनडीए)चा 56वा कोर्स एकत्र केला होता. भारतीय लष्कराच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं झालं आहे. जेव्हा तिन्ही सेनांचे प्रमुख एनडीएचे 1976च्या बॅचचे क्लासमेट आहेत.

तत्पूर्वी 1991मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख सुनीत फ्रान्सिस रॉड्रिग्ज, नौदल प्रमुख ऍडमिरल लक्ष्मी नारायण रामदास आणि एअर चीफ मार्शल निर्मल चंद्र सुरी या तीन क्लासमेटनी तिन्ही सेनांचं नेतृत्व केलं होतं. ज्यांनी एनडीएचा कोर्स एकत्र केला होता. लेफ्टनंट जनरल नरवणे 13वे  लष्करप्रमुख आहेत. ज्यांनी एनडीएचा कोर्स केलेला आहे. त्याशिवाय एनडीएमध्ये शिकणाऱ्या 11 कॅडेट्सनी नौदलाची आणि नऊ कॅडेट्सनं हवाई दलाची धुरा सांभाळली आहे. इतर सेना प्रमुखांनी भारतीय सैन्य अकादमी, वायुसेना अकादमी आणि नौसेना अकादमीतून शिक्षण घेतलं आहे. कोण आहेत मनोज नरवणे ?नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण 'ज्ञानप्रबोधिनी'त झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून 1980 ' 7 शीख लाइट इन्फंट्री'मधून लष्करात रुजू झाले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे 'इन्स्पेक्टर जनरल', स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील 'जनरल ऑफिसर इन कमांडिंग', लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर काम करताना त्यांनी ठसा उमटवला. युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव नरवणेंना आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्यांच्या या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.