शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

‘भारत की बात’ करणारे ‘भारत कुमार’ निवर्तले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 07:07 IST

Manoj Kumar: ‘भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ...’, असे म्हणत आपल्या चित्रपटांद्वारे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे दर्शन घडवणारे अभिनेते - दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ हरिकृष्ण गोस्वामी (८७) यांचे शुक्रवारी निधन झाले.

 मुंबई - ‘भारत का रहनेवाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ...’, असे म्हणत आपल्या चित्रपटांद्वारे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती, परंपरा आणि कलेचे दर्शन घडवणारे अभिनेते - दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ हरिकृष्ण गोस्वामी (८७) यांचे शुक्रवारी निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, शशी व कुणाल ही दोन मुले, असा परिवार आहे. 

पाकिस्तानात असलेल्या अबोटाबाद येथे १९३७ मध्ये मनोज कुमार यांचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत आले. मनोज कुमार यांना बालपणापासूनच चित्रपटांची आवड होती. बालपणी त्यांनी दिलीप कुमार यांचे ‘शहीद’सह इतरही काही चित्रपट पाहिले. दिलीप कुमार यांच्या ‘शबनम’मधील ‘मनोज’ हे नाव त्यांनी घेतले.

दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव‘पूरब और पश्चिम’, ‘शहीद’, ‘क्रांती’, ‘उपकार’ आदी देशभक्तीपर चित्रपटांसोबतच त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये काम केले. ‘शहीद’मध्ये त्यांनी साकारलेल्या भगतसिंग यांचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी कौतुक केले. १९६१मध्ये प्रदर्शित ‘कांच की गुडिया’ चित्रपटामध्ये ते प्रथमच मुख्य भूमिकेत दिसले. त्यांचे ‘रोटी कपडा और मकान’, ‘वह कौन थी’, ‘शोर’, ‘हरियाली और रास्ता’, ‘गुमनाम’, ‘शादी’, ‘पत्थर के सनम’, ‘सावन की घटा’, ‘शिर्डी के साईबाबा’ आदी चित्रपट गाजले. ‘सहारा’, ‘चांद’, ‘हनीमून’, ‘पिया मिलन की आस’, ‘सुहाग सिंदूर’, ‘रेशमी रुमाल’, ‘डॉ. विद्या’, ‘गृहस्थी’ आदी चित्रपटांतील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. मनोज यांना १९९२मध्ये पद्मश्री, तर २०१५मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  - जिंदगी की ना टुटे लडी.../५ 

 

टॅग्स :Manoj Kumarमनोज कुमारbollywoodबॉलिवूड