शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांना अमेरिकेतही अफवा कळायच्या तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 22:14 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी अमेरिकेत होते. त्यावेळी त्यांना विश्वजित राणे एकदाच भेटले होते.

- सदगुरू पाटीलपणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत होते, तेव्हा गोव्यातील सगळ्या राजकीय अफवांबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत असे. कधी काँग्रेसचे तर कधी भाजपचे आमदार फुटले, कधी दिगंबर कामत भाजपमध्ये जातील तर कधी नेतृत्व बदल होईल, अशा प्रकारच्या अफवांचे पिक गोव्यात आले होते. पर्रीकरांना त्यांच्या सेवेतील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सगळ्य़ा अफवा कळायच्या. शेवटी पर्रीकर यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, गोव्यात कुणाला किती रोंबाट घालायचे आहे ते घालू द्या, असा सल्ला अधिकाऱ्यांसह सर्वानाच दिला.

पर्रीकर यांच्याबरोबर उपेंद्र जोशी हे वरिष्ठ अधिकारी अमेरिकेला गेले होते. जोशी हे मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात काम करतात. पर्रीकर यांना रोज इस्पितळात रहावे लागत नव्हते. ते उपचार घ्यायचे व मग त्यांना दिल्या गेलेल्या अपार्टमेन्टमध्ये रहायचे. रोज त्यांच्याकडे गोव्याहून भुषण सावईकर या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडून 5 फाईल्सची यादी जायची. ती यादी अमेरिकेत उपस्थित अधिकारी जोशी यांनी वाचून दाखविल्यानंतर मग फाईल्स मंजूर करणे किंवा अन्य निर्णय घेण्याबाबतचा सोपस्कार पार पाडला जात असे. या कालावधीत गोव्यातील राजकीय अफवाही पर्रीकर यांना कळायच्या. ब:याच अफवा ऐकून झाल्यानंतर त्यांनी शेवटी अफवांवर जाऊ नये, कुणाला किती रोंबाट घालायचे आहे ते घालू द्या असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. 

अमेरिकेत गोवा सरकारमधील एक मंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पर्रीकर यांना एकदाच भेटले. मंत्री राणे हेही त्याच कालावधीत आपल्या एका कामासाठी अमेरिकेला गेले होते. दिगंबर कामत भाजपमध्ये फेरप्रवेश करणार असल्याची अफवाही पर्रीकर  यांना समजली पण त्यांनी दुर्लक्ष केले. भाजप पश्रश्रेष्ठी एकतर्फी निर्णय घेणार नाहीत याची कल्पना त्यांना असल्याने त्यांनी अफवा गंभीरपणे घेतल्या नाहीत, असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाAmericaअमेरिका