शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात मनोहरलाल खट्टर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 15:35 IST

हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

ठळक मुद्देमनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीदुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ  घेतली. खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. 

चंदीगड - हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता खट्टर यांनी रविवारी (27 ऑक्टोबर) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ  घेतली. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. 

दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीचे समर्थन मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा दाखल केला. राज्यपालांनी त्यांना लगेचच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्याआधी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी खट्टर यांची एकमताने निवड करण्यात आली. मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले होते की, राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर देशभर दिवाळी साजरी होत असतानाच दुपारी शपथविधी सोहळा पार पडला आहे. खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. 

दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाचे 40, जेजेपीचे 10 व अपक्ष 6 अशा एकूण 56 आमदारांचा आपणास पाठिंबा आहे. आपल्या सर्व समर्थक आमदारांसह आपण दावा दाखल केला होता, असे ते म्हणाले होते. दुष्यंत यांच्या मातोश्री नयना चौटाला या राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे आधी सांगण्यात आले होते. भद्रा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यानंतर आता दुष्यंत चौटाला हे हरयाणाचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. 

हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडीत जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब केले होते. राज्यात मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री तर, दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री असतील असे अमित शहा यांनी नंतर पत्रकारपरिषदेत जाहीर केले होते. राज्यात स्थिरतेसाठी आपण ही युती केली असल्याचे चौटाला यांनी सांगितले होते. 

 

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपा