शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

Mann Ki Baat: इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 13:39 IST

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (27 फेब्रुवारी) मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले, भारताचा मौल्यवान वारसा आम्ही इटलीतून परत आणला आहे.

पंतप्रधानांकडून भारताच्या यशाचा उल्लेख -पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे. हा वारसा आहे, अवलोकितेश्वर पद्मपाणी यांची हजार वर्षांहूनही अधिक पुरातन मूर्ती. ही मूर्ती काही वर्षांपूर्वी बिहारमधील गयाजी येथील देवी संस्थान कुंडलपूर मंदिरातून चोरीला गेली होती. मात्र, विविध प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर, ही मूर्ती आता पुन्हा भारतात आली आहे. 

भगवान हनुमानजींची मूर्तीही भारतात परत आली - पंतप्रधान मोदी म्हणाले, काही वर्षांपूर्वी तामिळनाडूतील वेल्लोरमधून भगवान आंजनेय्यर, हनुमानजींची मूर्ती चोरीला गेली होती. हनुमानजींची ही मूर्तीदेखील 600-700 वर्षं पुरातन होती. या महिन्याच्या सुरुवातीला, आम्हाला ही मूर्ती ऑस्ट्रेलियामध्ये सापडली. आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात देशाच्या कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक सूंदर अशा मूर्ती घडत गेल्या. यात श्रद्धा होती, सामर्थ्य होते, कौशल्यही होते आणि त्यांत विविधताही होती. एवढेच नाही, तर आपल्या प्रत्येक मूर्तीच्या इतिहासात त्या-त्या काळाचा प्रभावही दिसून येतो. 

गेल्या 7 वर्षांत भारतात आल्या 200 हून अधिक मूर्ती -मोदी म्हणाले, 2013 पर्यंत सुमारे 13 मूर्ती भारतात आल्या होत्या. पण, गेल्या सात वर्षांत भारताने 200 हून अधिक मौल्यवान मूर्ती यशस्वीपणे परत आणल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी आणि सिंगापूर, अशा अनेक देशांनी भारताची भावना समजून घेत या मूर्ती परत आणण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान