शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेशी मैत्रीमध्ये सिंग यांची महत्त्वाची भूमिका : बायडेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 07:08 IST

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर दिल्ली येथील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.   यावेळी  राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदी नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. देशभरातून आलेल्या असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिंग यांना शनिवारी अखेरचा निरोप दिला. 

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पार्थिव शनिवारी सकाळी काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर, फुलांनी सजविलेल्या लष्करी ट्रकवर राष्ट्रध्वजात गुंडाळलेले मनमोहनसिंग यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्या ट्रकमध्ये माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांसमवेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही होते. काँग्रेस मुख्यालयातून निघालेली मनमोहनसिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाटावर सकाळी साडेअकरा वाजता पोहोचली. तिथे नेते व विविध देशांतून आलेल्या मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 

मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली म्हणून मॉरीशसने राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला. सूर्यास्तापर्यंत  सर्व सरकारी कार्यालये व संस्थांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकत होते. मॉरीशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी या निर्णयाची घोषणा केली.

सॅन फ्रान्सिस्को : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, सिंग यांनी भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे प्रशंसोद्गार काढले आहेत.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, मनमोहनसिंग हे खरे मुत्सद्दी आणि दृष्टे नेते होते. त्यांची रणनीतिक दूरदृष्टी आणि राजकीय धैर्य यांशिवाय भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अभूतपूर्व उंचीवर जाणे शक्यच नव्हते. नागरी अणुकरारापासून भारत-प्रशांत क्षेत्रातील क्वाडच्या प्रारंभापर्यंत विविध करार आणि सहयोग त्यांच्यामुळेच प्रत्यक्षात येऊ शकले. त्यांनी तयार केलेल्या रूपरेखेमुळे आमची राष्ट्रे आणि विश्व यांना आगामी पिढ्यांसाठी मजबूत बनवले आहे. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सांगितले की, मनमोहनसिंग यांच्या निधनामुळे भारताची तसेच जगाची मोठी हानी झाली आहे. 

अणुकरारामुळे संबंध नव्या पातळीवर : राइसअमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कोंडोलिझा राइस यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, मनमोहनसिंग यांच्या निधनाच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. ते महान व्यक्ती आणि महान नेता होते. २००८ मध्ये त्यांनी नागरी अणुकराराच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध नव्या पातळीवर नेले. 

अर्थव्यवस्था बंधमुक्त केली : गीता गोपीनाथआंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी ‘एक्स’वर लिहिले की, मनमोहनसिंग यांनी १९९१च्या अर्थसंकल्पात भारतीय अर्थव्यवस्थेला बंधमुक्त केले. तसेच कोट्यवधी भारतीयांच्या आर्थिक विकासाला महत्त्वपूर्ण गती दिली. त्यांच्या सुधारणांमुळे असंख्य तरुण अर्थशास्त्रज्ञांना प्रेरणा दिली. 

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिका