शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांच्या अपमानाचे प्रकरण : पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, राज्यसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:13 IST

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी करीत, काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली हा तिढा सोडवण्यासाठी विरोधी नेत्यांशी चर्चा करणार आहेत, असे कळते.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागावी, अशी मागणी करीत, काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली हा तिढा सोडवण्यासाठी विरोधी नेत्यांशी चर्चा करणार आहेत, असे कळते.डॉ. सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिकाºयांशी चर्चा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या प्रचारसभेत केला होता. तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते. तसेच डॉ. सिंग यांनीही भोजन समारंभाबाबत निवेदन प्रसिद्ध करून, मोदी यांचे वक्तव्य खोटे असल्याचे दाखवून दिले होते. मोदी यांनी माफी मागावी, असेही डॉ. सिंग म्हणाले होते. लोकसभेत काँग्रेसचे सदस्य आक्रमक होऊन अध्यक्षांच्या आसनासमोर येत होते आणि आमचे म्हणणे ऐकून घ्या, अशी मागणी करत होते. एका माजी पंतप्रधानांचा अपमान झाला असून हे गंभीर प्रकरण असल्याचे काँग्रेस सदस्यांचे मत होते. या गदारोळातच अध्यक्षांनी कामकाज पुढे सुरू ठेवले.हा गदारोळ सुरू असताना सभागृहात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी उपस्थित होते. बोलण्याची परवानगी मिळत नसल्याचे पाहून काँगे्रस सदस्यांनी सभात्याग केला.राज्यसभेची समिती?माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध मोदी यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला संघर्ष किमान राज्यसभेत दूर होण्याची चिन्हे आहेत. या मुद्द्यावर एक पॅनेल स्थापन करण्यावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरून मोदी यांनी सभागृहात स्पष्टीकरण करावे, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य करत होते. सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चा करून यावरील मतभेद दूर करण्याचे आवाहन केले. त्यावर सहमती झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगParliamentसंसद