शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

मनमोहन सिंग यांची मोदींनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी, माजी उपराष्ट्रपतींची बदनामी केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:01 IST

गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी उपराष्ट्रपती यांच्यासह पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक आदींची एक बैठक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झाली, असा सनसनाटी आरोप करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व माजी उपराष्ट्रपती यांच्यासह पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक आदींची एक बैठक मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झाली, असा सनसनाटी आरोप करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे.मोदी हे बेजबाबदार विधाने करत असून या प्रकरणी मोदी यांनी मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली. आनंद शर्मा म्हणाले की, एका कार्यक्रमाला परराष्ट्र विभागाचे संबंधित आजी, माजी अधिकारी, राजकीय नेते, माजी लष्करप्रमुख, पत्रकार यांची उपस्थिती होती. ही गुप्त बैठक नव्हती.मोदीजी, प्रचारामध्ये अविश्वसनीय कथा नकोतभाजपचे ज्येष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी यांना लक्ष्य केले आहे. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याच्या मोदी यांच्या विधानाचा संदर्भ घेत शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी व्टिट केले आहे की, माननीय सर, निवडणुका जिंकण्यासाठी असमर्थनीय आणि अविश्वसनीय कथा दररोज सांगण्याची गरज आहे? जातीय वातावरण रोखा. सुदृढ राजकारण आणि निवडणुकांची आज गरज आहे.आम्हाला धडे नकोत पाकिस्तानने केलेल्या खुलाशानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पाकिस्तानला लक्ष्य केले. ते म्हणाले की, पाकिस्तानने केलेले वक्तव्य हे काँग्रेस पक्षाला दिलासा देण्यासाठी केल्यासारखे वाटते. पाकिस्तानी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांच्या व्टिटनंतर प्रसाद यांनी म्हटले आहे की, भारत आपल्या देशातील लोकशाही स्वबळावर चालविण्यासाठी सक्षम आहे. मी पाकिस्तानला हे सांगू इच्छितो की, भारताचे पंतप्रधान हे निवडून आलेले लोकप्रिय पंतप्रधान आहेत. भारतात दहशतवादाला फूस देण्यात पाकिस्तानचा हात असल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धडे देणे बंद करावे.मोदीजी, गुजरातवर बोला जरा : राहुलपंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात गुजरातच्या विकासावर न बोलता भलत्याच विषयांवर विधाने करीत आहेत. त्यांनी पाकिस्तान वा अन्य विषयांवर बोलण्याचे सोडून गुजरातमध्ये २२ वर्षांत भाजपाने काय विकास केला, हे सांगावे, असा टोला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला.राहुल गांधी रोज पंतप्रधानांना गुजरातविषयी सवाल करीत असून, त्याची उत्तरे मागत आहेत.जिंकण्यासाठी आम्हाला वादात ओढू नका : पाकइस्लामाबाद : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा उल्लेख झाल्यानंतर पाकिस्तानने आज स्पष्ट केले की, तुमच्या राजकारणात आम्हाला ओढू नका. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी व्टिट केले आहे की, आपल्या निवडणूक चर्चेत आम्हाला ओढणे बंद करा. असे षडयंत्र करण्याऐवजी आपल्या ताकदीवर निवडणूक जिंकावी.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग