शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात मनमोहन सिंग, आज करणार दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 09:14 IST

 गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे.

ठळक मुद्दे गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे. जरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते मैदानात उतरवले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.

अहमदबाद-  गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे. इतकंच नाही, तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात आहेत. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते मैदानात उतरवले आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करणार आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात नोटाबंदी आणि जीएसटीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. यावरून काँग्रेसला सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात काही प्रमाणात यशही मिळाले आहे. त्यामुळे टीकेचा हा मारा आणखीनच तीव्र करण्यासाठी मनमोहन सिंग यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

गुजरातमध्ये आज एका दिवसाच्या दौऱ्यावर मनमोहन सिंग आहेत. आजच्या या दौऱ्यामध्ये मनमोहन सिंग तेथील व्यापाऱ्यांशी जीएसटीच्या मुद्द्यावर बोलणार आहेत.  नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर दोन टक्क्यांनी घसरेल, हे मनमोहन सिंग यांचं भाकीत खरं ठरलं होतं. पण, जागतिक बँकेकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात भारताने व्यवसाय सुलभता निर्देशांकात मोठी झेप घेतल्याचं स्पष्ट झालं. पण विरोधकांनी जमिनीवरील चित्र प्रत्यक्षात वेगळं असल्याची शंका यावेळी उपस्थित केली. यावरून नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे मनमोहन सिंग यांना लक्ष्य केलं. मी असा पंतप्रधान आहे की, ज्याने अजूनही जागतिक बँकेची इमारतही बघितलेली नाही. पण, यापूर्वी जागतिक बँकेत काम केलेले लोक या पदावर होते. हेच लोक आता जागतिक बँकेच्या अहवालाविषयी शंका घेत असल्याची टीका मोदींनी केली होती.

मंगळवारी गुजरातमध्ये प्रचाराला आल्यावर मनमोहन सिंग हे अहमदाबाद येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदही घेणार आहेत. गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. तो दिवस काँग्रेस ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करणार आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी मनमोहन सिंग यांचा गुजरात दौरा होणार आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या आजच्या गुजरात दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

मनमोहन सिंग गुजरातमध्ये व्यापाऱ्यांशी साधणार संवादआज गुजरात दौऱ्यावर असणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लघु उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. तसंच मनमोहन सिंग पत्रकार परिषदही घेणार आहेत. अर्थव्यवस्थेतवर आधारीत एका चर्चासत्रातही मनमोहन सिंग सहभाग घेतील.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017