शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे गुरु सावरकरांनीच देशाचं धर्माच्या आधारे विभाजन केले, मणिशंकर अय्यर यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 09:07 IST

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मणिशंकर अय्यर एका आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त पाकिस्तानमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती असामान्य असल्याचे सांगितले. शिवाय ''विनायक दामोदर सावरकर यांनी 1923 मध्ये हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला, या शब्दाचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नव्हता. त्यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती आणि त्यांचेच समर्थक सध्या भारतात सत्तेत आहेत'', असे वादग्रस्त विधान मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले. वादग्रस्त विधान करण्याची मणिशंकर यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आक्षेपार्ह विधान करत वाद निर्माण केले आहेत. 

दरम्यान, रविवारी (6 मे) त्यांनी मोहम्मद अली जिना यांचे कौतुक केले होते. यामुळे भाजपाने अय्यर यांच्यावर प्रचंड टीका केली. यावर त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले की, ''मी जिना यांचा उल्लेख कायदे आझम म्हणून केला. त्यावर मला पत्रकार विचारतात तुम्ही जिना यांचे कौतुक कसे काय केले?. मग पाकिस्तानमध्ये राहणारे अनेक जण गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा करतात. मग ते देशभक्त नाहीत का'', असा उलट प्रश्नच त्यांनी उपस्थित केला.

सोबतच अलिगड मुस्लिम युनिर्व्हसिटीतील जिना यांचा फोटो सरकारी गुंडांनी हटवल्याचं सांगतदेखील त्यांनी भाजपावर टीका केली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मणिकशंकर अय्यर यांच्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसवर गुजरात निवडणुकीप्रमाणे कर्नाटक निवडणुकीतही पाकिस्तानला सहभागी केल्याचा आरोप केला आहे.दरम्यान,  गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींबाबत अपशब्दांचा वापर केल्यानं काँग्रेसनं कारवाई करत मणिशंकर अय्यर यांची पार्टीतून हकालपट्टी केली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर