नवी दिल्ली, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील टीकेची धार वाढवली आहे. मात्र मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा तोल ढळत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंह यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषा असलेले ट्विट करून वाद ओढवून घेतल्यानंतर रविवारी मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी मोदींबाबत शिवराळ भाषेत ट्विट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मनीष तिवारी यांनी एका ट्विटला उत्तर देताना हे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरली आहे. ट्विटमध्ये तिवारी म्हणतात,"याला म्हणतात चु**ला भक्त बनवणे आणि भक्तांना पर्मनंट चु* बनवणे. जय हो! अगदी महात्माजीसुद्धा मोदींना देशभक्ती शिकवू शकत नाहीत!!!
दिग्विजय सिंहांपाठोपाठ मनीष तिवारी यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 16:36 IST