शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:31 IST

Manish Sisodia: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीमधील एका न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीमधील एका न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी कनिष्ठ न्यायालय, हायकोर्टा आणि सुप्रीम कोर्टाने सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला होता. आता राउज एवेन्यू कोर्टाच्या या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. 

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी राऊज एवेन्यू कोर्टामध्ये मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने सुरक्षित ठेवला होता. सिसोदिया हे घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती सीबीआयने कोर्टात न्यायाधीशांसमोर केली होती. जामीन मिळाल्यास ते पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील, असा दावा सीबीआयने केला होता. दरम्यान, कोर्टाने आज सिसोदिया यांचा जामीन फेटाळून लावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील (पटपरगंज) लोकांना एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी लिहिलं की, "लवकरच बाहेर भेटू. गेल्या एक वर्षात मला सर्वांची आठवण आली. आम्ही सर्वांनी मिळून अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. स्वातंत्र्याच्या वेळी जसे सर्वजण लढले, त्याचप्रमाणे आपण चांगल्या शिक्षणासाठी आणि शाळांसाठी लढत आहोत, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाdelhiदिल्लीCourtन्यायालय