शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

लाचप्रकरणी 'ओएसडी'वर कठोर कारवाई करा - मनिष सिसोदिया; भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 12:01 IST

काऊंटडाऊन सुरू

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे 'ओएसडी' गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेताना सीबीआयने गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना मनिष सिसोदिया यांनी या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर, 'ओएसडी' कोणत्याही बॉसच्या माहितीशिवाय लाच घेऊ शकत नाही, असे म्हणत भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मनिष सिसोदिया यांच्यावर आरोप केला आहे.

यांसदर्भात मनिष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "मला समजले की, एका जीएसटी अधिकाऱ्याला लाच घेताना सीबीआयने अटक केली आहे. हा अधिकारी माझ्या कार्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत होता. सीबीआयने या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या 5 वर्षांत अशा अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मी स्वत: पकडले आहे."

दुसरीकडे, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटकरून मनिष सिसोदिया यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कोणाही 'ओएसडी' आपल्या बॉसच्या माहितीशिवाय लाच घेऊ शकत नाही. केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत." याशिवाय, भ्रष्टाचारविरोधात केलेल्या आंदोलनातून जन्मलेली पार्टी भ्रष्टाचारावर बंद होणार आहे, असेही अमित मालवीय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेताना अटक करण्यात आली. जीएसटी संबंधीतील एका प्रकरणात दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम घेताना गोपाल कृष्ण माधव यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर गोपाल कृष्ण माधव यांना लगेच सीबीआयच्या मुख्यालयात येण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

कालचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजपा आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला. शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बॉलीवूड स्टार खासदार सनी देओल, तर काँग्रेससाठी अभिनेता तसेच खासदार राज बब्बर यांनी ‘रोड शो’ व पदयात्रा केल्या. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. गुरुवारचा दिवस सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा साऱ्यांनीच प्रयत्न केला.

काऊंटडाऊन सुरू

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला असून मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे.शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. जवळपास १ कोटी ४६ लाख मतदारांच्या हातात उमेदवारांचे भवितव्य आहे. यातील ८० लाख ५५ हजार पुरुष व ६६ लाख ३५ हजार महिला मतदार आहेत.७० मतदारसंघांमध्ये २६८८ मतदान केंद्रांची व्यवस्था आयोगाने केली आहे. यातील ५१६ मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

अमित शहांनी ठिकाण-वेळ ठरवावी, मी चर्चेला तयार : केजरीवाल

भाजप-काँग्रेसचे ‘रोड शो’, आपची ‘झाडू यात्रा’; अमित शहा, राज बब्बर यांनी गाजवला दिवस

सच्चा हिंदू मैदान सोडून पळत नाही; केजरीवालांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकCBIगुन्हा अन्वेषण विभागdelhiदिल्ली