शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

"मनीष सिसोदिया यांनी AC, खुर्च्या, पंखे आणि LED चोरले", भाजप आमदाराचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:49 IST

भाजप आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (आप) पराभव झाला, तर भाजपने विजय मिळवला. या विजयानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेवरून  आप आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात पटपडगंज येथील भाजप आमदार रवींद्र सिंह नेगी यांनी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

रवींद्र सिंह नेगी यांनी आरोप केला की, "मनीष सिसोदिया आणि आपच्या कार्यकर्त्यांनी पटपडगंज येथील आमदार कार्यालयातील सर्व सरकारी साहित्याची चोरी केली आहे. मनीष सिसोदिया आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार कार्यालयातून एसी, खुर्च्या, पंखे आणि एलईडी चोरले आहेत."

दरम्यान, रवींद्र सिंह नेगी यांनी केलेल्या आरोपाबाबत पीडब्ल्यूडीचे जेई वेद प्रकाश यांनी भाष्य केले आहे. पीडब्ल्यूडीकडून आमदारांच्या कार्यालयात कोणतेही साहित्य पुरवले नव्हते, असे जेई वेद प्रकाश यांनी सांगितले. तर दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांचे प्रतिनिधीनी सांगितले की, एकही सरकारी वस्तू घेतलेली नाही. तसेच, जे आमचे साहित्य होते. कार्यकर्त्यांचे साहित्य होते, ते कार्यकर्ते घेऊन गेले.

आपकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया नाहीयाचबरोबर, मनीष सिसोदिया यांच्या प्रतिनिधीने असेही सांगितले की, ज्या २ एसी गायब असल्याचा आरोप केला जात आहे, त्या भाड्याने घेतल्या होत्या. त्यामुळे ज्यांचे एसी होते, त्यांनी ते  काढून घेतले. दरम्यान, भाजप आमदाराने मनीष सिसोदिया यांच्यावर केलेल्या आरोपांवर आम आदमी पक्षाकडून (आप) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपBJPभाजपाdelhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूक