शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:19 IST

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सेनापती (मणिपूर) : काँग्रेस मणिपूरला पुन्हा शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण बनवू इच्छिते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे सांगितले. आपला पक्ष राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही ते म्हणाले. 

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेव्हा राहुल यांची बस येथील गजबजलेल्या भागातून गेली, तेव्हा बहुतांश करून महिला आणि मुलांसह अनेक लोकांनी यात्रा मार्गावर रांगेत उभे राहून राहुल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सेनापती येथे बसच्या टपावर उभे राहून त्यांनी लोकांना संबोधित केले.

‘याआधी काँग्रेसने कन्याकुमारी ते  काश्मीर अशी यात्रा काढली. लोकांना एकजूट करणे हा या यात्रेचा उद्देश होता. ही यात्रा खूप यशस्वी ठरली. यादरम्यान आपण चार हजार कि.मी. चाललो’, असे ते म्हणाले. 

तुमच्या वेदनांची जाणीवआम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणखी एक यात्रा करायची होती व आम्ही ठरवले की मणिपूरपासून सुरुवात करणे ही सर्वांत प्रभावी गोष्ट असेल. कारण, यामुळे मणिपूरचे लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे भारतीय जनतेला कळू शकेल. तुम्ही सोसलेल्या वेदनांची मला  जाणीव आहे,  असे राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा