शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, चुराचांदपुर जिल्ह्यात कलम १४४ लागू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 11:57 IST

मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या तुरळक हिंसाचारानंतर चुराचांदपुर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Manipur Violence  ( Marathi News ) : इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चुराचांदपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. यानंतर मणिपूर सरकारने जिल्ह्यात पाच दिवस मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. याशिवाय, दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात सभांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, हिंसक चकमकीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, सीआरपीसीच्या च्या कलम १४४ अंतर्गत निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. 

मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या तुरळक हिंसाचारानंतर चुराचांदपुर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, लोकांच्या दोन गटांमधील संघर्षामुळे अजूनही शांतता भंग होण्याची शक्यता आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश सोमवारी लागू करण्यात आला असून तो १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लागू राहील. या अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास आणि शस्त्र बाळगण्यास मनाई आहे.

सीबीआयचे संचालक प्रवीण सूद हे मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या प्रकरणांच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी इंफाळला पोहोचले. सीबीआय हिंसाचाराच्या २७ प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान, मे महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत सीबीआयच्या जवळपास सर्व युनिट्सना भेट देणारे प्रवीण सूद हे पहिले सीबीआय प्रमुख आहेत. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ते गुवाहाटीहून इंफाळ विमानतळावर पोहोचले. राज्यातील सद्यस्थितीबाबत राज्याचे डीजीपी राजीव सिंह यांच्याशी चर्चा केली. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेट