मागच्या जवळपास दोन वर्षांपासून जातीय हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात असला तरी हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
अमित शाह यांनी आज मणिपूरमधील सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अमित शाह यांनी आणि ८ मार्चपर्यंत मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर सर्वसामान्य जनतेला मुक्तपणे ये जा करता यावी, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेच. तसेच रस्त्यांवर अडथळे आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी दिली. या बैठकीला राज्याचे राज्यपाल, गृहसचिवांसह बडे लष्करी अधिकारी उपस्थित होते.
याबरोबच अमित शाह यांनी जबरदस्तीने खंडणी वसुलीच्या प्रकरणांमध्येही कठोर करावाई सुरू ठेवण्याचे आदेश दिल आहेत. याशिवाय मणिपूरला लागून असलेल्या आंततराष्ट्रीय सीमेवर होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी काही एंट्री पॉईंटच्या दोन्ही बाजूंना तार लावण्याचं काम लवकरच पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. याबरोबरच अमित शाह यांनी आढावा बैठकीमध्ये मणिपूरला व्यसनमुक्त बनवण्यासाठी अमली पदार्थांचा कारभार करणारं जाळं उद्ध्वस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटीबद्ध आहे. तसेच त्यासाठी सर्वतोपरी मदत दिली जात आहे.