शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:44 IST

Manipur violence : मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.

Manipur violence : हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमध्ये आता म्यानमारमधील अतिरेक्यांच्या घुसखोरीमुळे आता चिंता वाढली आहे. शेजारच्या म्यानमारमधून मणिपूरमध्ये ९०० कुकी अतिरेक्यांच्या प्रवेशाबद्दल आणि सशस्त्र ड्रोनच्या वापराबद्दल गुप्तचर अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत शनिवारी सुरक्षा सल्लागारांनी दुजोरा दिला आहे. मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या गुप्तचर अहवालाला हलक्यात घेता येणार नाही.

दुसरीकडे, एनडीटीव्हीने उच्च गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दक्षिण मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवरील जिल्ह्यांच्या सर्व वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना गुप्तचर अहवाल पाठवण्यात आला आहे. गुरुवारी पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे की, ९०० कुकी अतिरेक्यांनी अलीकडेच ड्रोन-आधारित बॉम्ब, प्रोजेक्टाइल, क्षेपणास्त्रे आणि जंगल युद्धाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांनी म्यानमारमधून मणिपूरमध्ये प्रवेश केला आहे.

गुप्तचर सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, कुकी अतिरेकी प्रत्येकी ३० सदस्यांच्या तुकड्यांमध्ये विभागले गेले आहेत आणि सध्या ते वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. ते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मैतेई गावांवर हल्ले करू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत कुलदीप सिंह म्हणाले की, हा अहवाल १०० टक्के बरोबर आहे. जोपर्यंत तो चुकीचा सिद्ध होत नाही तोपर्यंत, आम्ही तो १०० टक्के अचूक असल्याचे मानतो, कारण तुम्हाला कोणतेही इंटेलिजन्स इनपुट १०० टक्के अचूक असल्याचे गृहीत धरले पाहिजे आणि त्यासाठी तयार राहिले पाहिजेत.

"म्यानमारमधून पळून येत आहेत कुकी"कुलदीप सिंह पुढे म्हणाले की, म्यानमारमधील चिन प्रांत आणि इतर राज्यांमधील कुकी आणि वांशिक सशस्त्र गट जुंटा यांच्यात संघर्ष होत आहे. त्यांनी देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे, जो पूर्वी जुंटाच्या ताब्यात होता. काही संघर्ष भारतीय सीमेजवळ झाला आहे, त्यामुळे सीमेला लागून असलेल्या भागातील सैनिक पळून भारतात येण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांचा पाठलाग करताना बिनी प्रांतातील बंडखोरही भारतात घुसण्याच्या प्रयत्न करतात.

काही जिल्हे हाय अलर्टवर१ सप्टेंबरपासून वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, १८ सप्टेंबर रोजी स्ट्रॅटेजिक ऑपरेशन ग्रुपची बैठक झाली आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय गुप्तचर अहवालांवरही चर्चा करण्यात आली आहे. गुप्तचर अहवालाबाबत एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय चुराचंदपूर, फेरजौल, टेंगनोपाल, कमजोंग आणि उखरुल जिल्ह्यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार