शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना लस घ्या, बक्षीस मिळवा’, घरी घेऊन जा TV आणि मोबाइल फोन! प्रशासनाची खास स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 13:11 IST

या शिबिरात, जे लोक कोरोना लस घेतील, त्यांना टेलिव्हिजन सेट, मोबाईल फोन अथवा ब्लँकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे.

लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता जगभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत आणि बक्षिसे दिली जात आहेत. काहीसे असेच आता मणिपूरमध्येही दिसून येत आहे. येथे लोकांना लस घेतल्यानंतर टीव्ही सेट (tv) आणि मोबाईल फोन (Mobile Phone) जिंकण्याची संधी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहतीनुसार, मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात मेगा लसीकरण शिबिराचे आयोजिन करण्यात आले आहे. या शिबिरात, जे लोक कोरोना लस घेतील, त्यांना टेलिव्हिजन सेट, मोबाईल फोन अथवा ब्लँकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. (Take Corona vaccine and win a tv, mobile phone)

अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की इंफाल पश्चिम जिल्हा प्रशासनाला लसीकरण वाढवायचे आहे. त्यामुळे येथे प्रशासनाने ‘लस टोचा, बक्षीस मिळवा’ (Get a shot, win a prize) असे म्हणत, मेगा व्हॅक्सीनेशनसह बंपर ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

24 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर आणि सात नोव्हेंबरला जिल्ह्यातील तीन केंद्रांवर या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्याचे उपायुक्त टीएच किरनकुमार यांनी यासंदर्भात एक नोटिफिकेशनही जारी केले आहे. यात सांगण्यात आले आहे, की तीन केंद्रांवर लस घेणाऱ्यांना बंपर ड्रॉमध्ये भाग घेण्याची आणि बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल. 

बक्षिसात काय?नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे, की पहीले बक्षीस एक मोठ्या स्क्रीनचा टीव्ही सेट, दुसरे बक्षीस मोबाईल फोन आणि तिसरे बक्षीस ब्लँकेट आणि इतर 10 उत्तेजनार्थ बक्षिसे, असे या लकी ड्रॉचे स्वरूप असेल. तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती कोविड -19 लसीकरणाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या डोससाठी सहभागी होण्यास पात्र असेल, असेही यात सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या