शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर पेटलेले, ते संसदेत हसतात; राहुल गांधी यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; भारतीय सैन्य हिंसाचार थांबवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:44 IST

राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर  टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांपासून मणिपूर जळत असताना पंतप्रधानांनी संसदेत हसणे आणि विनोद करणे शोभणारे नाही.

काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, पंतप्रधानांना असे वाटते की, मणिपूर जळावे आणि राज्याला जळू द्यावे. केंद्र सरकारला हिंसाचार थांबवायचा असेल तर सरकारच्या हातात अशी साधने आहेत, जेणेकरून हिंसाचार थांबविता येईल. तिथे महिला आणि मुले मरत आहेत. महिलांची छेडछाड आणि अत्याचार होत आहेत आणि देशाचे पंतप्रधान संसदेच्या मध्यभागी बसून हसत आहेत. 

ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली हे वक्तव्य पोकळ  नव्हते. मी पंतप्रधानांना संसदेत २ तास बोलत, हसत, मस्करी करताना पाहिले. माझा भारतीय सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक भारतीयाला माहीत आहे की, जर भारतीय सैन्याला हा हिंसाचार संपवायला सांगितले तर तो लगेच थांबेल.

राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे?मणिपूरच्या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित आहेत. राहुल गांधी यांना नेमके काय हवे आहे? युवतींवरील अत्याचाराची बाब संसदेत ऐकवावी? तीन महिन्यांपासून त्यांच्याकडे व्हिडीओ टेप होता, तर त्यांनी तो तपास यंत्रणांना का दिला नाही?, असे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी  ‘लोकमत’ला सांगितले. तो व्हिडीओ त्यांच्याकडे आधीच होता तर तो दाबून का ठेवला? तो तपास यंत्रणांकडे का दिला नाही? गिरिराज सिंह म्हणाले, खरे तर राहुल गांधी व काँग्रेसला मणिपूरमध्ये दोन मणिपूर करायचे आहेत. त्यांच्या मनात चोर आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी