शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा तणाव, मुख्यमंत्र्यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून कुकी समुदाय रस्त्यावर; भाजप नेत्याचं घर जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 08:45 IST

Manipur : मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा निषेध केला. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण दिसून आले. शनिवारी कुकी-जो समुदायाच्या लोकांनी आदिवासी बहुल भागात तीन रॅली काढल्या. या रॅलींमध्ये कुकी-जो समुदायाने वेगळ्या प्रशासनाची मागणी केली. तसेच, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा निषेध केला. या क्लिपमध्ये काही आक्षेपार्ह विधान असल्याचे म्हटले जात आहे.

यादरम्यान, पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता चुरचंदपूरमधील तुइबोंग उपविभागातील पेनिअल गावात भाजपचे प्रवक्ते मायकेल लामजाथांग यांच्या वडिलोपार्जित घराला अज्ञात हल्लेखोरांनी आग लावली. हल्ल्यादरम्यान घराच्या आवारात उभ्या असलेल्या एका कारलाही आग लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी एक्सवर लिहिले की, "शांतता रॅलीच्या नावाखाली आपल्या लोकांना (या प्रकरणात थाडू) लक्ष्य करणे, ही एक गंभीर त्रासदायक प्रवृत्ती आहे. अशा चिथावणीखोर कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देऊनही पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल."

कुठे-कुठे काढण्यात आली रॅली?कुकी-जोच्या वतीने या रॅलींचे आयोजन आदिवासी बहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि तेंगनौपाल जिल्ह्यांतील अनुक्रमे लीशांग, कीथेलमनबी आणि मोरेह येथे करण्यात आले होते. चुराचंदपूरमधील निषेध रॅली लिशांगमधील अँग्लो कुकी वॉर गेटपासून सुरू झाली आणि सुमारे सहा किमीचा प्रवास संपवून तुईबाँग येथील शांती मैदानावर संपली. 

कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आणि झोमी स्टुडंट्स युनियनने पुकारलेल्या या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कांगपोकपीमध्ये शेकडो आंदोलकांनी कीथेलमन्बी मिलिटरी कॉलनीपासून सुरू झालेल्या रॅलीत भाग घेतला. ही रॅली आठ किमी अंतर कापल्यानंतर थॉमस मैदानावर संपली. स्वतंत्र प्रशासनाच्या मागणीसाठी भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह शहरात निषेध मोर्चाही काढण्यात आला.

दिल्लीतही जोरदार निदर्शनेदुसरीकडे. कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली शनिवारी दिल्लीतील जंतरमंतरवर जोरदार निदर्शने करण्यात आली. दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे कुकी समाजाचे लोकही या निदर्शनात सहभागी झाले होते. सर्व आंदोलकांच्या हातात फलक होते, ज्यात मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापलेला होता. हे लोक मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या कथित ऑडिओचा निषेध करत आहेत, ज्यामध्ये त्यांनी कुकी समुदायाबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याचे म्हटले आहे. 

आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर हल्लाबोल केला. बिरेन सिंह हे मैतई समाजाचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या १६ महिन्यांत आमच्यावर अनेक अत्याचार झाले आहेत. आमच्या समाजातील महिलांना नग्न करून मारहाण करण्यात आली. आम्हाला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा नको आहे, पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे, असे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार