शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:19 IST

संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी येथे प्रारंभ झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या सभेचे उद्घाटन केले. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी होसबळे यांनी मांडलेल्या वार्षिक अहवालात मणिपूरसह उत्तर-दक्षिण भेद, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती आणि महाकुंभची यशस्वी सांगता या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

 संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

संघाच्या कार्याची शताब्दीयंदाच्या विजयादशमीला संघाच्या कार्याची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या दृष्टीने २०२५-२६ शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, त्याची रूपरेषा या सभेत तयार केली जाणार आहे.

डॉ. मनमोहनसिंग, हुसेन यांना श्रद्धांजलीसह सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी पहिल्या दिवशीचे सत्र पार पडल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना शुक्रवारी प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, प्रीतीश नंदी, एस. एम. कृष्णा, राम जन्मभूमीचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल, तुलसी गौडा, शंकर तत्ववादी आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे सांगितले.

मणिपूरमध्ये परिस्थिती सुधारतेयसहसरकार्यवाह मुकुंद यांनी मणिपूरमध्ये २० महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर वार्षिक अहवालात असलेल्या उल्लेखांवर भाष्य केले. ही स्थिती असली तरी केंद्र सरकार आणि मणिपूरच्या जनतेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कार्यामुळे खूप मोठी आशा निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

मातृभाषेतील शिक्षणालाच महत्त्वभाषेच्या निमित्ताने उत्तर-दक्षिण वाद वाढवण्याचे प्रयत्न राजकारणात होत आहेत. मात्र रा. स्व. संघ प्रादेशिक भाषांनाच महत्त्व देतो. मातृभाषेतील शिक्षणालाच संघाने महत्त्व दिले असल्याचे मुकुंद यांनी नमूद केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBengaluruबेंगळूर