Manipur Assembly Election 2022: मणिपूरमध्ये दोन टप्प्यात होणार मतदान; १० मार्चला लागणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 04:32 PM2022-01-08T16:32:35+5:302022-01-08T17:26:18+5:30

मणिपूर विधानसभा क्षेत्रातील (Manipur Assembly) ६० जागांसाठी आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मणिपूरमध्ये मतदान पार पडणार आहे.

Manipur Assembly Election 2022 Voting Dates and Results Details Polling in 2 Phases Results on March 10 | Manipur Assembly Election 2022: मणिपूरमध्ये दोन टप्प्यात होणार मतदान; १० मार्चला लागणार निकाल

Manipur Assembly Election 2022: मणिपूरमध्ये दोन टप्प्यात होणार मतदान; १० मार्चला लागणार निकाल

Next

Manipur Assembly Election 2022 Voting Dates and Results: राष्ट्रीय निवडणूक आयोगाने मणिपूरसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या. एकूण सात टप्प्यात हे मतदान पार पडणार असून पाचही राज्यातील मतमोजणी १० मार्चला होणार आहे. मणिपूरमध्ये विधानसेभेच्या ६० जागांसाठी मतदान होणार असून हे मतदान दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान हे २७ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे ३ मार्च रोजी होणार आहे.

मणिपूरच्या पहिल्या टप्प्यातील मतदारासंघातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ फ्रेब्रुवारी आणि तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ११ फ्रेब्रुवारी असणार आहे. या पहिल्या टप्प्याचे मतदान २७ फेब्रुवारीला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघासाठी उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी तर अर्ज मागे घेण्याची मुदत १६ फेब्रुवारीपर्यंत असेल. या टप्प्यातील मतदान ३ मार्चला पार पडणार आहे.

मणिपूरमधील उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीत जास्त २५ लाख रूपये खर्च करण्याची मर्यादा आहे. कोरोनाचा हाहा:कार माजल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच निवडणुका घेतल्या जात असल्याने विविध सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलिंग बूथवर सॅनिटायझरची सोय असणार आहे. मणिपूरमधील एकूण ५७ टक्के नागरिकांना लसीचा किमान एक तरी डोस आणि ४३ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळालेले आहेत.

२०१७ साली मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. ४ आणि ८ मार्च रोजी मणिपूरमध्ये मतदान झाले होते. तर ११ मार्चला निवडणुकीचे निकाल हाती आले होते. सध्या मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचे सरकार आहे. सरकारमध्ये भाजपचे २९, नागा पीपल्स फ्रंटचे ४, नॅशनल पीपल्स पार्टीचे ३ तर एक अपक्ष आमदार आहेत. तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे १५ जागा असून ७ जागा रिक्त आहेत.

Web Title: Manipur Assembly Election 2022 Voting Dates and Results Details Polling in 2 Phases Results on March 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.