अध्यक्षपदी माणिकमहाराज पवार
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
वाल्हे : महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे पुरंदर तालुक्यामध्ये वारकरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. वारकरी सेवा संघाच्या पुरंदर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी माणिकमहाराज पवार, तर उपाध्यक्षपदी विलास श्रीपती भुजबळ यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी माणिकमहाराज पवार
वाल्हे : महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे पुरंदर तालुक्यामध्ये वारकरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. वारकरी सेवा संघाच्या पुरंदर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी माणिकमहाराज पवार, तर उपाध्यक्षपदी विलास श्रीपती भुजबळ यांची निवड करण्यात आली. सासवड येथील संत सोपानकाका महाराज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महामंडळातर्फे पुरंदर तालुक्याची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली.कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्षपदी माणिकमहाराज पांडुरंग पवार, उपाध्यक्षपदी विलास श्रीपती भुजबळ व ज्ञानेश्वर गणपत घारे, सचिव अंकुश परखंदे, खजिनदार शिवाजी यादवराव भोसले, कार्याध्यक्ष बाळासाहेब सादबा डांगे, संचालक ज्ञानेश्वर गोविंद भुजबळ, पांडुरंग शंकरराव जाधव, तुकाराम चिव्हे, शिवाजी नारायण लिंबोरे, शांताराम सीताराम लोंढे, विजयमहाराज भिसे व ज्ञानेश्वर नथोबा बाठे यांची निवड करण्यात आली.फोटो : अध्यक्ष- माणिकमहाराज पवार