शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

ऐन हंगामात आंबा महागला!

By admin | Updated: April 28, 2015 23:45 IST

मार्चचा शेवटचा पंधरवडा व एप्रिलच्या सुरुवातीला देशभरात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळांच्या राजा आंब्याला मोठा तडाखा बसला आहे.

नवी दिल्ली : मार्चचा शेवटचा पंधरवडा व एप्रिलच्या सुरुवातीला देशभरात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळांच्या राजा आंब्याला मोठा तडाखा बसला आहे. देशातील प्रमुख आंबा उत्पादक राज्यांत जवळपास ५० टक्के पीक वाया गेले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आंब्याच्या दरात सुमारे ६० टक्के वाढ झाली आहे. ‘असोचेम’ने (असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया) गारपीट व अवकाळी पावसाने आंब्याचे झालेले नुकसान व त्याचा निर्यातीवर झालेल्या परिणामाचा अभ्यास केला. त्यात हापूस आंब्याचा दर डझनामागे ५०० ते ६०० रुपये झाल्याचे त्यांना आढळले, तर इतर स्थानिक आंब्याला किलोमागे १०० रुपये मोजावे लागत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. ही दरवाढ ६० टक्क्यांच्या घरात आहे. भारतात उत्तर प्रदेशामध्ये आंब्याचे मोठे उत्पादन होते. अवकाळी पावसाने तेथील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही नैसर्गिक आपत्तीने हापूस आंब्यासह विदर्भ व मराठवाड्यातील पिकाचे नुकसान झाल्याचे ‘असोचेम’च्या अहवालात म्हटले आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक व बिहार राज्यांतही आंब्याला फटका बसला आहे. संबंधित राज्य सरकारांनी आंबा उत्पादकांना नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मात्र, ती पुरेशी नसल्याचे ‘असोचेम’चे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी सांगितले. कमी उत्पादनामुळे साहजिकच निर्यातीवरही परिणाम झाला असून यावर्षी भारतातून खूपच कमी म्हणजे फक्त ४१ हजार २८० टन आंब्याची निर्यात होणे अपेक्षित आहे. त्याचवेळी केवळ १० लाख टन उत्पादन होणाऱ्या पाकिस्तानातून ४० हजार टन आंब्याची निर्यात होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)४भारतातून संयुक्त अरब अमिरातीत एकूण निर्यातीच्या जवळपास ६१ टक्के निर्यात होते. त्यानंतर युनायटेड किंगडम (१२ टक्के), सौदी अरेबियात (५ टक्के) भारतीय आंबा निर्यात केला जातो. गेल्या काही वर्षांत भारतातून कतार, अमेरिका, ओमान, कुवेत या देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीतही मोठी वाढ नोंदविली गेली आहे.