शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Mandsaur Gangrape: नुकसानभरपाई नको, त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, पीडितेच्या वडिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 12:00 IST

आम्हाला पैसे नको, परंतु त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मध्य प्रदेशातल्या बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

नवी दिल्ली- आम्हाला पैसे नको, परंतु त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी मध्य प्रदेशातल्या बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केली आहे. मला कोणतीही नुकसानभरपाई नको, आरोपींना फाशी व्हावी ही माझी इच्छा आहे. तत्पूर्वी शनिवारी डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी करत मुलीच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे.शिवराज सिंह चौहान सरकारनं पीडितेच्या वडिलांना पैसे देण्याचा प्रयत्न केला असता, वडिलांनी पैसे नको, आरोपींना फासावर चढवा, अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशच्या महिला आणि बालविकासमंत्री अर्चना चिटणीस म्हणाल्या, मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी पीडितेच्या वडिलांच्या बँक खात्यात 5 लाख रुपये जमा केले आहेत. पोलीस आरोपींना लवकरात लवकर अटक करेल, अशी आशा आहे. जेणेकरून त्यांना फासावर लटकवलं जाईल. मुलीची रुग्णालयाचं बिल आणि शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. मध्य प्रदेशमधल्या मंदसोरमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या या चिमुकलीचे इरफान उर्फ भैय्यू (20) याने अपहरण करून तो तिला बस स्थानकाजवळील झुडपांच्या मागे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. स्थानिक बाजारपेठेत मजूर म्हणून काम करत असलेल्या इरफानला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने दिल्लीत 2012साली नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर सहा जणांनी सामुदायिक बलात्कार केला होता, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.