शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मंडलनिहाय नोंदीने पावसाचे वास्तव स्पष्ट

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती
अरुण बारसकर
सोलापूर: अवघा १६ टक्के पाऊस झाल्याने सोलापूर जिल्‘ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खोलवर जात आहे.
राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्‘ात निचांकी पाऊस पडला आहे. जिल्‘ात अवघा १६ टक्के पाऊस पडला आहे. एकीकडे सोलापूर जिल्‘ात पाऊस नाही तर दुसरीकडे उजनी धरणातील पाणीही कमी होत आहे. यामुळे पाण्याची स्थिती अधिकच नाजूक बनू लागली आहे. सोलापूर जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. अवघ्या २५ मंडलात १०० मि.मी. पेक्षा अधिक अन् १५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्‘ात आतापर्यंत एकूण ८४५ मि.मी. इतका तर सरासरी ७७ मि. मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण १७८९ मि.मी. व सरासरी १६२ मि.मी. इतका पाऊस पडला होता. बागायती क्षेत्रासाठीच्या स्पर्धेमुळे बोअरवेलने केलेली जमिनीची चाळण व पाऊस गायब झाल्याने शेतीपिके दिसेनाशी झाली आहेत.
चौकट
यंदा पाऊसच पडला नाही
जिल्‘ातील दहिगाव(माळशिरस), मंडलामध्ये १४ मि.मी.,कोळा(सांगोला) या मंडलात १५ मि.मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस मागील तीन महिन्यात पडला आहे. अन्य मंडलातील अनेक गावात यावर्षी पावसाचा थेंबही पडला नाही. कधीतरी अन् एखाद्या गावात चार-चार थेंब पडलेल्या पावसाची आकडेवारी १४ मि.मी. पर्यंत पोहोचली आहे.
चौकट
० मैंदर्गीत सर्वाधिक पाऊस..
मार्डी, मुस्ती, बार्शी, खांडवी, आगळगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, तडवळ, करजगी, नरखेड,रांझणी, कुर्डूवाडी, म्हैसगाव, करमाळा, केम, अर्जुननगर, पंढरपूर, तुंगत, पुळूज, बोराळे या मंडलामध्ये १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक १६९ मि.मी. पाऊस मैंदर्गी मंडलामध्ये पडला आहे.
० शेळगी, वळसंग, बोरामणी, जेऊर(अक्कलकोट), वाघोली, कामती बु., पेनूर, टाकळी सिकंदर, जेऊर(करमाळा), उमरड, कासेगाव(पंढरपूर), भंडीशेगाव, पटवर्धनकुरोली, हतीद, शिवणे या मंडलामध्ये २५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे.
चौकट
तर वाळवंटाचे स्वरूप..
सोलापूर जिल्‘ात बागायती क्षेत्र वाढीसाठी ७०० फुटांपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल घेतले आहेत. हे बोअरवेल सध्या कोरडे पडू लागले आहेत. २००-३०० फुटांपर्यंतचे अनेक भागातील बोअर केव्हाच कोरडे पडले आहेत. आगामी कालावधीत पाऊस नाही पडला तर जिल्‘ाला वाळवंटासारखे स्वरूप येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.