शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनी लॉंड्रिंगप्रकरणी फुटीरवादी नेता शब्बीर शाहला सात दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 17:08 IST

मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला फुटीरवादी नेता शब्बीर शाह याला कोर्टाने सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली आहे.  

श्रीनगर, दि. 26 - मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला फुटीरवादी नेता शब्बीर शाह याला कोर्टाने सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली आहे.  फुटीरवादी आणि हुर्रियत नेता शब्बीर शाह याला मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली होती. त्यांनतर बुधवारी त्याला दिल्लीला आणण्यात आले. शब्बीर शाहला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात दाखल केले असता, कोर्टाने त्याला सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शब्बीर शाहला सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा समन्स पाठवले होते. तरीही तो सक्तवसुली संचालनालयासमोर हजर राहिला नाही. अखेर त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते. 

गेल्या दोन दोवसांपूर्वी दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सात फुटीरवादी नेत्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फुटीवरवादी नेते गिलानी यांच्या जावयाचाही समावेश आहे. या सर्वांवर काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी फंडिंग केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अलताफ शाह, अयाझ अकबर, पीर सैफुल्लाह, मेहराज, शाहिद-उल-इस्लाम, नईम खान आणि बिट्टा यांचा समावेश आहे. याचबरोबर, राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्याच महिन्यात अलताफ शाह यांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी शाहिद-उल-इस्लाम यांच्याही परिसरात झडती घेण्यात आली होती. शाहिद-उल-इस्लाम हा हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मिरवेज उमर फारुख यांचा साथीदार आहे. अलताफ शाह गिलानी यांचा जावई असून तेहरिक-ए-हुर्रियतसाठीही तो काम करतो. धोरणं विकसित करुन त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये त्याचा महत्वाचा सहभाग असतो. फुटीवरवादी संघटनांना मिळणारा निधी खो-यात विध्वंसक गोष्टी आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असून त्यावर पुर्णपणे बंदी आणण्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेला काही अकाऊंट बुक्स सापडले आहेत. तसेच दोन कोटींची रोख रक्कम, बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांचे लेटर-हेड्सही सापडले आहेत. लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीनचे लेटर-हेड्स त्यामध्ये आहेत. 2002 रोजी आयकर विभागाने काही गिलानी यांच्यासह काही फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करत छापे टाकले होते. यावेळी काही रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. मात्र कोणताही गुन्हा त्यावेळी दाखल करण्यात आला नव्हता.