शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:24 IST

'पृथ्वी नेहमीसाठी सुरक्षित राहणार नाही, मानवदेखील डायनासोरप्रमाणे नामशेष होईल.'

नवी दिल्ली: सध्या जगातील अनेक देश चंद्र आणि मंगळावर राहण्याच्या शक्यता पडताळत आहेत. याबाबत अनेक वर्षांपासून संशोधनदेखील सुरू आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी चंद्र आणि मंगळवार राहण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. अनेकजण विचारतात की मानवाला अवकाशात पाठवण्याची काय गरज? आपली पृथ्वी राहण्यासाठी योग्य जागा आहे, मग अवकाश प्रवास कशाला? याला उत्तर देताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'डायनासोरप्रमाणे एक दिवस मानव पृथ्वीवरुन नष्ट होईल. एकतर तो स्वत: याला जबाबदार असेल किंवा निसर्ग त्याला नष्ट करेल.'

एका कार्यक्रमात बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले की, 'चंद्र आणि मंगळावर सातत्याने लघुग्रहांचा आघात होत असतो. कारण तेथील वातावरण आणि संरक्षणासाठी उपलब्ध नसलेले तंत्रज्ञान. पण, पृथ्वीवर अनुकूल वातावरण आहे, ज्यामुळे आपण अनेक वर्षांपासून लघुग्रहांच्या हल्ल्यापासून वाचत आलो आहोत. पण, मानव पृथ्वीवर कायम राहणार नाही. डायनासोर नष्ट झाले, त्याप्रमाणे मानवदेखील नष्ट होईल. मानवाने राहण्यासाठी नवीन जागा शोधली नाही, तर एक दिवस पृथ्वीसह मानवाचाही अंत होईल.'

मानवी अंतराळ उड्डाणाची का गरज आहे?'अंतराळ संशोधनासाठी अंटार्क्टिकावर जगभरातील अनेक देशांनी केंद्रे उभारली आहेत. भारताचेही तेथे तीन केंद्रे आहेत. याची काय गरज काय होती? भविष्यात आपण ठराविक क्षेत्रात पाऊल ठेवले नाही तर आपण तेथून बाहेर फेकले जाऊ. भारताने चंद्रावर पाऊल ठेवले नाही तर भविष्यात जगभरातील लोक तेथे जातील आणि भारताला येऊ देणार नाहीत. त्यामुळेच या अभ्यासासाठी भारताने अंटार्क्टिकामध्ये केंद्र उभारले आहे.' 

लवकरच भारताचे स्पेश स्टेशन असेलसोमनाथ पुढे म्हणाले की, 'गगनयान हा एक नवीन प्रयत्न आहे. यावर्षी आपण मानवी स्पेसफ्लाइट एक्सपो सुरू करत आहोत. 100 वर्षांनंतर आपण अंतराळात आपले स्पेस स्टेशन बनवू. फक्त गगनयानापर्यंत थांबणार नाही. भविष्यात जगातील मोठ्या अंतराळ मोहिमेत अनेक मोठे देश सामील होतील, तेव्हा त्यात भारतातील अंतराळवीरांचाही समावेश असायला हवा.' 

पुढच्या पिढ्या सौरमालेच्या बाहेर जातीलसोमनाथ म्हणाले की, 'भारताने चांद्रयान-1, मंगळयान यासह अनेक मोहिमा केल्या आहेत, ज्यामुळे आपला देश, आपले शास्त्रज्ञ, आपले लोक आणि आपली इस्रो जगातील कोणत्याही देशाशी स्पर्धा करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. पण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांची सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धी. म्हणूनच आम्ही त्यांना हवामान, शेती, आपत्ती, जलवाहतूक, दळणवळण अशा सुविधा देत आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या केवळ इतर ग्रहांवरच नव्हे तर सूर्यमालेतील आणि त्यापुढील ग्रहांवरही जातील,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :isroइस्रोNASAनासाMarsमंगळ ग्रह