शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारनं 15 लाख न दिल्यानं त्यानं केला बँक जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 15:16 IST

योग्य वेळी पोलीस दाखल झाल्यानं अनर्थ टळला

बहराईच: उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवल येथे एका तरुणानं अलाहाबाद बँकेची शाखा पेटवण्याचा प्रयत्न केला. यासाठी या तरुणानं स्वत:सोबत 7 लिटर पेट्रोल आणलं होतं. तरुणानं बँकेची शाखा पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ माजली. नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेलं 15 लाख रुपये बँक खात्यात जमा करण्याचं आश्वासन न पाळल्यानं या तरुणानं बँकेची शाखा पेटवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी चौकशीनंतर दिली. धनराजपूरचा रहिवासी असलेला मौजीलाल नावाचा तरुण सकाळी पावणे अकराच्या सुमारास अलाहाबाद बँकेच्या शाखेत आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 'पंतप्रधान मोदींनी 15 लाख रुपये बँक खात्यात जमा होतील, असं सांगितलं होतं. मात्र मोदींनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही, असं मौजीलालचं म्हणणं होतं. मोदींनी न दिलेले पैसे बँक अधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी मौजीलाल करत होता,' असं पोलिसांनी सांगितलं. मौजीलालची ही मागणी पूर्ण करण्यास बँक कर्मचाऱ्यांनी असमर्थतता दर्शवली. त्यामुळे त्यानं त्याच्याकडे असलेले 7 लिटर पेट्रोल बँकेच्या शाखेत ओतलं आणि आग लावण्याची धमकी दिली. या घटनेमुळे शाखेत एकच गोंधळ झाला. यावेळी झालेल्या गोंधळात काहीजण जखमी झाले. यानंतर मौजीलालनं आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मौजीलालला अटक करुन घटनेचा तपास सुरू केला. मौजीलालची मानसिक स्थिती ठिक नसल्याची माहिती जरवल पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय सिंह यांनी प्राथमिक चौकशीनंतर दिली.  

टॅग्स :bankबँकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा