शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

केजरीवालांना सचिवालयात धक्काबुक्की; अज्ञातानं डोळ्यात फेकली मिरचीपूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 17:02 IST

सुदैवानं केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.

नवी दिल्ली: दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या अंगावर एका व्यक्तीनं मिरचीपूडदेखील फेकली. सचिवालयात हा संपूर्ण प्रकार घडला. यामध्ये केजरीवाल यांचा चष्मा तुटला. सुदैवानं केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. मात्र या घटनेमुळे सचिवालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.अरविंद केजरीवाल यांना अनिल नावाच्या एका व्यक्तीनं सचिवालयाच्या पायऱ्यांजवळ थांबवलं. यानंतर त्यानं केजरीवाल यांचा चष्मा खेचला आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. या झटापटीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला. यानंतर पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतलं. केजरीवाल दुपारच्या जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडत असताना ही घटना घडली. सुदैवानं केजरीवाल सुरक्षित आहेत. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा भाजपानं निषेध केला आहे. लोकशाहीतील हिंसेला थारा नसल्याचं भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी म्हटलं आहे. हल्लेखोराविरोधात कठोर कारवाई व्हावी, असंही गुप्ता म्हणाले. तर आपच्या आमदार अलका लांबा यांनी ही घटना म्हणजे केजरीवाल यांच्या विरोधातील कट कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. सचिवालयासारख्या सुरक्षित ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर हल्ला होता. ही बाब अतिशय गंभीर असल्याचं त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीAAPआप