शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

CoronaVirus News: धक्कादायक! दोघांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 13:54 IST

CoronaVirus News: कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकण्यात आल्यानं एकच खळबळ; गुन्हा दाखल

बलरामपूर: उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुण एक मृतदेह पुलावरून नदीपात्रात फेकताना दिसत आहेत. मृतदेह फेकणाऱ्या दोघांपैकी एकानं पीपीई किट घातला आहे. सिसई घाटावर असलेल्या पुलावर हा धक्कादायक प्रकार घडला असून इथून जाणाऱ्या एका वाहन चालकानं तो मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.व्हायरल झालेला व्हिडीओ २९ मेच्या संध्याकाळचा आहे. व्हिडीओत पीपीई किटशिवाय दिसणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. त्याचं नाव चंद्र प्रकाश आहे. तो स्मशानघाटावर काम करतो. काही लोकांनी मला पुलावर बोलावलं होतं आणि मृतदेह खाली फेकला होता, असं प्रकाशनं सांगितलं. 'काही लोक आले आणि त्यांनी मला पुलावर नेलं. मी पुलाच्या दुसऱ्या टोकाला उभा होतो. तेव्हा एका तरुणानं बॅगेची चैन उघडून दगड टाकला आणि मला बोलावलं. त्यानंतर नदीत मृतदेह टाकून परत गेला. इथे लाकडं असल्याचं मी त्याला सांगितलं. पण मृतदेह जलप्रवाहित करायचं असल्याचं उत्तर त्यानं दिलं. त्याच्यासोबत अनेक जण होते. त्यांनी माझं ऐकलं नाही,' असं प्रकाशनं सांगितलं. व्हायरल व्हिडीओबद्दल मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय बहादूर सिंह यांना विचारलं असता, नदीपात्रात टाकण्यात आलेला मृतदेह सिद्दार्थनगर जिल्ह्यातल्या शोहरतगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनाथ मिश्र नावाच्या व्यक्तीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. '२५ मे रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रेमनाथ यांना संयुक्त जिल्हा रुग्णालयातील एलटू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. २८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. कोविड प्रोटोकॉलचं पालन करून त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला,' अशी माहिती त्यांनी दिली. मृतदेह नदीत फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या