शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 21:04 IST

आंदोलकांनी बंदुकधाऱ्याला पकडलं; अद्याप पोलीस तक्रार नाही

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनात आज एक बंदुकधारी घुसल्यानं खळबळ निर्माण झाली. या बंदुकधाऱ्यानं आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आज दुपारच्या सुमारास शाहीन बागेत दोन जण घुसले होते. त्यातल्या एकाकडे बंदूक होती. आंदोलकांनी संपूर्ण परिसर रिकामा करावा. अन्यथा माणसं मारली जातील, अशी धमकी या व्यक्तीनं दिली. या व्यक्तीला आंदोलकांनी ताब्यात घेतलं. दुपारी तीनच्या सुमारास बंदुकीसह शाहीन बागेत घुसलेल्या एका व्यक्तीनं व्यासपीठावर चढून उपस्थितांना आंदोलन संपवण्यासाठी धमकावलं. काही उपस्थितांनी त्याला पकडून त्याच्या हातातली बंदूक काढून घेतली. यानंतर त्याला मारहाणदेखील करण्यात आली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी सईद तासीर अहमदनं दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहीन बाग आंदोलनाशी संबंधित एका ट्विटर अकाऊंटवरुनदेखील हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. 'आंदोलन परिसरात बंदुकधारी समाजविघातक घटकांची घुसखोरी', या मजकूरासह हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.  दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यानं शाहीन बागेतले आंदोलक अतिशय सतर्क झाले आहेत. लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं शाहीन बागेत यावं, असं आवाहन आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या व्यक्तीकडे बंदुकीचा परवाना होता, असंदेखील पोलिसांनी सांगितलं. शाहीन बागेत गेल्या महिन्याभरापासून सीएए, एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व महिला करत आहेत. शांततापूर्ण मार्गानं करण्यात येणाऱ्या या आंदोलनाचं काही जणांकडून कौतुक होत आहे. तर आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्यानं काही जण यावर टीकादेखील करत आहेत. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी