शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गाय चोरत असल्याच्या संशयावरुन जमावाची बेदम मारहाण; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 10:40 AM

जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं सत्र सुरुच

धलाई: गाय चोरत असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील रायश्याबरीमधील मान्याकुमार पारा या दुर्गम गावात हा प्रकार घडला. गायीची चोरी करत असल्याच्या संशयावरुन जमावानं बुधी कुमार यांना जबर मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे. बुधी कुमार एका ग्रामस्थाच्या घराजवळ असलेल्या गोठ्यात गेले होते. त्यांना पाहताच गोठ्याच्या मालकानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर इतर ग्रामस्थ तिथे जमा झाले. त्यांनी बुधी यांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलीस उपमहासंचालक अरिंदम नाथ यांना दिली. 'बुधी कुमार पकडून जाण्याचा प्रयत्न करताना काहींनी त्यांना पकडल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर संतप्त जमावानं त्यांना जबर मारहाण केली,' असं नाथ यांना सांगितलं.रायश्याबरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बुधी कुमार यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर जखमी झाल्यानं सकाळी त्यांचा मृत्यू झाला. बुधी यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. गायींची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या घटनेनंतर त्रिपुरा गोरक्षा वाहिनीचे अध्यक्ष मुर्तजा उद्दीन चौधरी यांनी केली.