शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 14:56 IST

सलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यावेळच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देसलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यावेळच्या निवडणुकीत करावा लागत आहे मतदारांच्या नाराजीचा सामनाप्रचाराला येणाऱ्या भाजपा उमेदवारांवर मतदारांकडून होत आहे प्रश्नांची सरबत्ती भाजपा आमदार आणि उमेदवार दिलीप शेखावत यांच्या गळ्यात घातला चपलांचा हार

भोपाळ - सलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यावेळच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी प्रचाराला येणाऱ्या भाजपा उमेदवारांवर मतदारांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे. असाच प्रकार राज्यातील नागदा जिल्ह्यामधील खाचरोद मतदारसंघात घडला आहे. सोमवारी संध्याकाळी येथे प्रचार करण्यासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात एका व्यक्तीने चपलांचा हार घातला.  खाचरोद मतदारसंघातून भाजपा आमदार दिलीप शेखावत निवडणूक लढवत आहेत. सोमवारी संध्याकाळी ते आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. मतदारांच्या भेटी गाठी आशीर्वाद घेत असतानाच अचानक एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. सुरुवातीला आमदार महोदयांना काहीच कळले नाही. मात्र गळ्यात चपलांचा हार पाहिल्यावर संतप्त झालेल्या आमदारांनी या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ वादावादी सुरू होती.   

विषेश बाब म्हणजे आमदारांना चपलांचा हार घालणाऱ्या व्यक्तीने भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळाचा छाप असलेली टोपी परिधान केली होती. मात्र या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणBJPभाजपा