शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना रिपोर्ट खिशात अन् दिल्ली ते कोलकाता प्रवास; अनेकजण गॅसवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:01 IST

CoronaVirus News: एकाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांची चिंता वाढली

कोलकाता: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे ३२ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा पावणे दहा लाखांच्या जवळ पोहोचला आहे. जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच काही जणांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना धोका निर्माण होत आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानं दिल्लीवरून कोलकाता गाठलं. त्याच्या या प्रवासात तो अनेकांच्या संपर्कात आला. त्यामुळे आता या एका प्रवासामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.एका ३४ वर्षीय व्यक्तीनं दिल्ली ते कोलकाता व्हाया गुवाहाटी असा प्रवास केला. त्यावेळी त्याच्या खिशात कोरोना चाचणीचा अहवाल होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पश्चिम बंगालमधल्या उत्तर २४ परगण्यात असलेलं घर गाठण्यासाठी या व्यक्तीनं १४ जुलैला स्पाईसजेटच्या विमानानं प्रवास केला. मात्र त्यावेळी दिल्ली ते कोलकाता अशी थेट विमानसेवा उपलब्ध नसल्यानं तो कनेक्टिंग फ्लाईटच्या मदतीनं गुवाहाटीमार्गे कोलकात्याला पोहोचला. संध्याकाळी ५ वाजता तो कोलकाता विमानतळावर दाखल झाला.विमानतळावर उतरताच त्यानं तिथल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटिन केंद्रात नेण्याची विनंती केली. मात्र विमानतळावरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. त्याच्या शरीराचं तापमानदेखील सामान्य होतं. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणातल्या अधिकाऱ्यांनी त्याला क्वारंटिन केंद्रात दाखल करण्यास नकार दिला. मात्र तरीही प्रवाशानं क्वारंटिन केंद्रात नेण्याची मागणी केली. आपल्याला खोकला असल्याचं म्हणत त्यानं खिशातून कोरोना चाचणीचा अहवाल बाहेर काढला. त्यावर पॉझिटिव्ह असा उल्लेख असल्यानं कर्मचाऱ्यांना धडकी भरली.विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीनं आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर प्रवाशाला विमानतळाजवळ असलेल्या न्यूटाऊनमधील कोरोना केंद्रात दाखल करण्यात आलं. कोलकाताला येताना संबंधित प्रवाशानं दोन विमानांमधून प्रवास केला होता. त्यावेळी तो नेमका कोणाकोणाच्या संपर्कात आला, त्याचा तपास आता करण्यात येत आहे. चिंताजनक!; कोरोनाने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत 606 जणांचा मृत्यू; महाराष्ट्राची स्थिती गंभीर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या