शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

'तुझ्या प्रियकराशी लग्न कर', सुसाइड नोट लिहून 'त्याने' संपविलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:41 IST

पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीने आत्महत्येचं पाऊल उचललं.

हैदराबाद- पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीने आत्महत्येचं पाऊल उचललं. पेशाने इलेक्ट्रिशन असणाऱ्या यादाद्री भोंगीर जिल्ह्यातील शमीरपेटमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने सुसाइड नोट लिहिली. यामध्ये त्याने पत्नीला 'प्रियकराशी लग्न कर', असं म्हंटलं आहे. तु तुझ्या प्रियकराशी लग्न कर, ही माझी शेवटची इच्छा असल्याचं या व्यक्तीने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. 

आचार्य (वय 24) असं या व्यक्तीचं नाव आहे. आचार्यचं उषा राणीसह दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. या दोघांना एक वर्षांची एक मुलगी आहे. आचार्य एका खासगी फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिशनचं काम करायचा. बुधवारी आचार्य यांने त्याच्या वडिलांना मेसेज केला होता. शेजारी राहणाऱ्या श्रीकांतमुळे आपण आत्महत्या करत आहोत, असं त्याने वडिलांना मेसेज करून सांगितलं. आचार्यच्या मेसेजनंतर वडिलांना त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन लागला नाही. कुटुंबातील लोक जेव्हा घरी पोहचली तेव्हा त्यांना आचार्य पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. 

आचार्य यांच्या घरात सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये आचार्यने पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाबद्दल लिहिलं आहे,असं पोलीस अधिकारी भास्कर रेड्डी यांनी सांगितलं. आचार्य यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे,'आई-बाबा मला माफ करा. मी एक अयशस्वी व्यक्ती आहे. कुणालाही माझ्यासारखा मुलगा मिळू नये. माझी पत्नी उषा व तिचा प्रियकर श्रीकांतचं लग्न लावून द्या, ही माझी शेवटची इच्छा आहे. उषाच्या घरच्यांचा यामध्ये काहीही संबंध नाही. तसंच माझ्या आत्महत्येसाठी उषाला दोष देऊ नका, असं आचार्यने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.  दरम्यान, आचार्यचे वडील सत्यनारायण यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्या