गेल्या काही दिवसापासून हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. काहींना व्यासपीठावर भाषण देताना तर काहींना क्रिकेटच्या मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे, पहाटे जीममध्ये व्यायाम करत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
ही मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. जबलपूरमधील गोरखपूर परिसरातील गोल्ड जिममधील ही घटना घडल्याचे वृत्त आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून, तो ५२ वर्षांचा आहे. यतीश सिंघाई असे त्याचे नाव आहे.
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
मिळालेल्या माहितीनुसार, यतीश सकाळी ६:४५ च्या सुमारास जिममध्ये वर्कआऊट करत होते. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जमिनीवर पडले. यावेळी जिम ट्रेनर आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना सीपीआर दिला आणि इतर मार्गांनी त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. यानंतर जिम ट्रेनर आणि इतर लोकांनीही त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
व्हिडिओमध्ये यतीश पांढरा टी-शर्ट घालून जिममध्ये वर्कआउट करत असल्याचे दिसत आहे. यावेळी, त्यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे ते जमिनीवर पडले. यावेळी जिम ट्रेनर आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्यांना सीपीआर दिला.